विधाता

 

तो विधाता असे वेगळाच बंदा

आहे लाखोंचा पोशिंदा

व्यक्ती गरीब असो वा कुण्या ही जातीधर्माचा

त्याच्या कल्याणाची त्यास सदैव असे चिंता

युगे न युगे रूप बदलून कधी राम तर कधी बुद्ध बनून

सकलजनांसाठी नवा अवतार घेऊन होई तो जिंदा

राम देवच नव्हता अन अल्ला कोण होता?

असे म्हणून नका करू हो त्याची निंदा

सब भूमी गोपाल की “, “जीजस लव्हस यू

असा संदेश देऊन तो लोकांना म्हणतो गुण्यागोविंदान नांदा

कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नाही आहेत सगळे मानव

हे तो हात जोडून सांगे नका हो आता जातीधर्मासाठी भांडा

वन्यप्रजाती कालौघात लुप्त झाल्या, जमिनीत मिळाल्या

जातीच्या नावाने एकमेकांचे गळे कापून, मानवजात संपवून,

करू नका हो शर्मिन्दा

 

तो विधाता असे वेगळाच बंदा

आहे लाखोंचा पोशिंदा