विधात्याची विचारसरणी

 

काय सुंदर हो त्या विधात्याची विचारसरणी

कुठला ही द्वेष न धरता मनी

देण्या संदेश शांतता, समतेचा

गौतम बुध्द, महावीर यांना धाडले धरीणी

 

 

एवढ्यावरच तो थांबला नाही

हेरून, होणार परकीयांची आक्रमणे

शिवाजी महाराज, राणा प्रताप या नरकेसरींना

जन्मून मोडली जुलूमशाही

 

 

खूप दूरदृष्टी होती त्याची

न माजो तेढ जातीधर्माची

पाठवून धरित्रीवर

सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजधुरिणांना

दूर केली कुचंबणा वंचितांची

 

 

काय आकलन हो त्याचे

होईल जनता गुलाम कुणाची हे जाणून

अवतारीले महात्मा गांधींना

देऊन हत्यार उपवासाचे

 

 

खुपच अंतर्यामी तो

व्हावे राज्य कायद्याचे, म्हणून

महामानवाच्या तोंडून

वदवून दिले महत्व घटनेचे

 

नमन करतो त्या परमेश्वराला

त्याच्या मनोवृत्तीला

कुठलाही आपपरभाव न ठेवता

समृध्द बनविले भारत देशाला