विवाहोत्सुक मुला–मुलींचे लग्न जुळवितांना
घरची जाणती कर्ती सवरती मोठी
करतात फारच गोची
लग्न जुळवायचे असते मुलाचे किंवा मुलीचे
पण ही मंडळी धरून आग्रह पत्रिकेचा
पहायची आहे केवळ जुजबी थोडी
करून सबब लाडी
संसार उभारणे सोडून
मंगळाचे अमक्या घरात आहे बस्तान
करून कुरापती करती खोडी
समजा महायत्ने जुळती पत्रिका
ही मंडळी टवकारीती कावळ्यापरी
झाल्यावर ही कार्यक्रम दाखविण्याचा
म्हणती मुलीचा लेटेस्ट फोटो असू दया जवळी
अहो, नवा संसार उभारावयाचा असतो गुण्या–गोविंदाने
आशीर्वाद देऊन मोठ्यापणाने
मोडून पत्रिकेचे जाळे
पुसून अमंगळ काळे
उच्चारून मंगलाष्टक प्रेमाने
उभारावा उमलता संसार जोमाने