दारू म्हणजे विष दारूण अती
भल्या भल्याची मारे ते मती
हयाच दारूपायी गेले राजे रजवाडे
जे होते राव ते रंक झाले
ताठमानेन चालणाऱ्यांना मिंधा हिन केले
दारू म्हणजे होय एक शापित भूतपिशाच
एकदा लागल माग कि करते भूईसपाट
क्षणभर करते दारू माणसाला मदमस्त
दुसऱ्या क्षणी करते आयुष्य उध्वस्त
आयुष्याच्या वेलीवरचा आहे तो जालीम किडा
आजच संकल्प करा अन दारू सोडा
दारू म्हणजे सुखाचा ऱ्हास अन जीवनाचा अंत
पहा जीवनाकडे, असू दया भ्रांत