आमच देवाला मानन ही मोठ मजेदार आहे
एकीकडे म्हणते राम, रहीम आमचे आराध्य दैवत आहे
त्यांच्या मंदिर–मस्जिदीत जाऊन तुफान गर्दी ही करतो
अन दुसरीकडे न्यायालयात ऍफेडेव्हिट दाखल करून
त्यांचे अस्तित्व ही नाकारतो
अन राम–रहीम मनघडत कल्पना आहे अस कोणी म्हणताच
देशात विद्वंस माजवितो
मित्र हो, सोडा हो हे दोगलेपन
अरे ज्याला आपण आराध्य मानतो मग तो आहे किंवा नाही
याबद्दल मनात शंकाच नको
त्यांचे चांगले विचार सदैव आपल्या उरात आपण बाळगलेच पाहिजे
अन जे काही संधीसाधू लोक आपल्या स्वार्थासाठी समाजात भांडण लावतात
त्यांची कूटचाल ओळखून वेळीच सावध व्हायला पाहिजे
काही स्वार्थी ज्यांना देशाशी, तेथील जनतेशी काहीही घेण–देण नाही
असे लोक केवळ मतांसाठी दोन समाजाला धर्मांधतेच्या नशेत झिंगवून,
कोंबडयासारखे झुंजवून एकाचा बळी घेतात व दुसऱ्याला रक्तबंबाळ करून,
मरणासन्न करून ठेवून राम–रहीमच्या मताच्या मांसाच्या प्रसादावर
यथेच्छ ताव देत बसतात
मरतो बिचारा सामान्य माणूस
पहा विचार करा… नाही तर मरण सामान्य जनतेचेच आहे