मौला, भगवंता तू काही निराळाच आहे
तुला कसला ही राग, लोभ नाही
गरीब असो, श्रीमंत असो
शरीराने ठणठणीत वा रोगाने जर्जर
तू नाही पाहत कोणाची जात वा धर्म
त्यासी तुला काही नाही साधर्म्य
तुला नाही काही सोवळ ओवळ
कोणी आंघोळ करून येवो वा पारोस
कोणी अवडंबर करो, लांड्या लबाड्या करो
त्यास सदबुद्धी देऊन तू माफ करिशी
आम्ही माणस मात्र वेगळी
तुझ्यावर सत्ता गाजवून
जाती, धर्म, गरीब, श्रीमंतीची रेषा ओढून
स्वतःचा स्वार्थ साधण्या तुझे नाव देऊन
देणग्या, व्रतवैकल्ये आदी नावावर लोकांस लुटती,
तासनतास तुझ्या दर्शनास ताटकळत ठेवती
व्ही. आय. पी. दर्शन, पास आदी गोंडस नावाखाली
पैशाची उकळन करती
दयाळा खरच तू खूप मोठा आहेस
सगळ्यांकडे तू समान नजरेने पाहतो
त्यांच्यामध्ये तू त्यातला बनून राहतो
संकट आल्यावर संकटाच्या मागे काठी घेऊन धावतो
इतका भला मोठा तुझा आधार आहे
म्हणूनच तू अवघ्या जनांच्या हृदयावर विराजमान आहे