शहर

शहर नव्हे

हा तर निष्ठूर, निर्ढावलेल्या लोकांचा बाजार

नसती थारा माया, ममता, करुणेला येथे

सिमेंटच्या जंगलात राहून काळजे बनली गोटे

 

लांबच लांब, उंच सखल, वाकडेतिकडे रस्ते

त्यावरून धावणारी, धूर ओकणारी, घरघरणारी वाहने

येता मधेच कुणी, अंगावर खेकसणारी बाळे

टांगती सौजन्याची, सृजनतेची वेशीवर लक्तरे

 

प्रत्येकास येथे घाई, काम असो वा नसो

काळीजशून्य देहावर सजवून उंचे साज, सुगंधित द्रव्य

स्थापूनी मंच, भरवूनी सभा, बैठका

हि मेणाची पुतळे, चाळविती माणुसकीची चाळे

 

शहर नव्हे हा तर स्वार्थी पुंडांचा बाजार

दिसता कोणी साधा भोळा, करिती त्याला क्षणात बेजार