संत महंत बनण्याचा आव

 

सहज मी माझ्या सहकर्म्याला सांगितले

आज मी अधिकमासाच्या पोथीचेपारायण केले

त्याचे उद्द्यापन म्हणून मी आज उपोषण ठेवले

ते ऐकताच तिने आश्चर्य वाटत मला म्हंटले

काय ? या वर्षी अधिकमास आहे, पण कोणता मास अधिकआला ?

ते ऐकताच मी चाट पडलो व तिच्याकडे पाहत राहिलो

 

खर सांगायच तर, आपल्याला कोणालाच

व्रतवैकल्ये कधी असतात ते माहितच नाही,

पंचांगात, कॅलेंडरमध्ये पाहून व टी. व्ही. वरच्या कथावाचकांचे एकून

त्यात लिहिल्या प्रमाणे, कोणी सांगितल्या प्रमाणे कृती करून

आपण फार मोठे ज्ञानी असल्याचा आव आणतो

व दुसऱ्याच्या व्रतवैकल्याला नावे ठेवून, अडाणी जाणून,

आपल्यालाच सर्व काही समजते, आपण करतो तीच पूजा

असे म्हणून, मनी ठेवून भाव दुजा इतरांना हिणवतो

त्या महिला सहकाऱ्याला मी प्रामाणिकपणे सांगितले

ज्या मराठी वर्षापासून अधिक मासाचीसुरुवात होते

तोच महिना त्या वर्षी अधिकम्हणून गणला जातो

ते ऐकताच ती चाट पडली व मजकडे एकसारखी पाहू लागली

 

मित्र हो, नका हो उगीचच संत महंत बनण्याचा आव आणू

कोणत व्रत, चतुर्थी, एकादशी कधी आहे ते तुम्हाला माहित नाही

तर निदान दुसऱ्या कुणाला नावे तरी नका ठेऊ

जर कोणी सांगत आहे तर त्याच ऐका

पंचांग, कॅलेंडर चाळून त्याची सत्यता पडताळा

 

अस प्रत्येक धर्मातच आहे, जो तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो

व बाकी लोकांना मंदबुध्दी बालक मानतो

व्रतवैकल्याचा अनादर केल्यास काय नुकसान होते

याच्या सुरस कथा सांगून पांडित्याचे डोस पाजतो

गणपती पूजन, लक्ष्मी पूजन, ईस्टर वा गुडफ्रायडे

यांचे नसतात तथाकथित धर्ममार्तंडांना माहित मुहूर्त

चांद कधी दिसणार आहेम्हणून परदेशात फोन करून विचारतो