संत महात्मे अन समाजसुधारकांनो


संत महात्म्यांनो अन समाजसुधारकांनो

कशास जन्मला तुम्ही

अन जन्मला, तर का समाजविघातक प्रथा अन रूढी

या विरुध्द भांडलात तुम्ही,

का समाजात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून गांजलात तुम्ही

का तुमचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे म्हणून

लिहून मोठमोठे ग्रंथ, पुस्तके अन कादंबऱ्या

प्राण सोडलात तुम्ही

एक तर तुम्ही जन्मच घ्यायचा नसता

अन जन्म घेतलाच तर एखादया दगडधोंड्यासारख,

गुराढोरासारख मुकाट सार सोसून

जगायच असत अपराध्यासारख तोंडास काळ फासून

अरे संत महात्म्यांनो अन समाजसुधारकांनो

तुमच्या विचारांची अन समाजसुधारणेची

आमच्या पिढीला नाही आहे गरज

आम्हाला पाहिजे फक्त आयत

आम्हाला पाहिजे फक्त प्रत्येक गोष्टीत आरक्षण

अरे तुमच्या विचारांना अन पुस्तकांना आम्ही फ़ासलाय हरताळ

हे तुमचे विचार वाटतात आज रटाळ

अरे त्या तुमच्या विचारांमुळे अन लिहिलेल्या पुस्तकांमुळे

कुठे होतात आंदोलने, कुठे होतात कोणत्या समाजावर हल्ले,

कुठे होतात पाशवी अत्याचार अन माजतो हाहाःकार

एव्हढेच नव्हे, अरे तुम्ही संत महात्मे अन समाजसुधारकांचे

जाळले जातात पुतळे अन विद्रुप करून तोडले जातात आतडे

फारच भयाण परिस्थिती ही

ज्यांनी समाज एकोप्याची रान वेचलं,

आयुष्याची नासाडी केली

आज त्यांच नाही काहीच महत्व

त्यांचे विचार पायदळी तुडविलेले पाहता

वाटते उगाच व्यर्थ गेल त्यांच पुरुषार्थ