"संविधानाचा" अंगीकार करा

 

आता तर मी कोणत्याही देवाला पूजन वा भजन टाळतो

कारण जेव्हा मी चाळतो त्यांचा इतिहास दिसते भलतच रहस्य

ज्यांना आपण पूज्य मानतो त्या देवांच आयुष्य ही असते गलिच्छ

 

वाचनात आल,

इंद्रदेव कुणा ऋषीच्या पत्नीच्या सौंदर्यावर मोहित होऊन

रूप पालटून करी त्या ऋषिपत्नीवर अतिप्रसंग

तर कौरव आपल्याच भावाच्या पत्नीला द्रौपदीला

भर सभेत, सर्वांदेखत, वस्त्रहरण करून करे नग्न

 

कुणा दुसऱ्या धर्माच्या धर्मग्रन्थात कुणी परवरदिगर

नऊ वर्षाच्या मुलीसोबत करे लग्न

अन पुरुषांना चारचार विवाह करा म्हणून असे त्यांच सांगण

कुण्या धर्मात सख्या भावाबहिणीतच होई विवाहकर्म

हे पाहून विचारपडे मनी का करू मी व्रतवैकल्ये,

का पाळू धार्मिक नियमे, का वाचू पोथीपुराणे,

का पुजू मी देवधर्म

 

अरे जे देवच स्वतः व्यभिचार करतात का त्यांना आदर्श मानू,

का अशा व्यभिचाऱ्यांची रसभरीत वर्णने लिहिलेली पुस्तके मी वाचू

 

त्यापरीस मी वाचेल भारताचा पवित्र ग्रंथ संविधान

जो स्त्रीपुरुषांना समान लेखतो

तंतोतंत पालन करेल मी त्यात लिहिलेल्या कायद्यांच,

अंगीकारल त्याच महत्व

कारण हेच पवित्र संविधान“, मग तो देव असो कि राक्षस

सर्वांना समान लेखून, पाप्याला त्याच्या कर्माची शिक्षा देतो

 

पोथीपुराणे झुठ आहेत अन भारताचे संविधानचकेवळ श्रेष्ठ आहे

मित्र हो, “संविधानाचाअंगीकार करा, त्यात लिहिल्याप्रमाणे आचरण करा,

भारतीय कायद्याचे पालन करा, तोच जगण्याचा कायदेशीर मार्ग आहे

पोथीपुराणे वाचून, डोक खराब करून घेण आहे