आता मानवधर्माला राहिली नाही किंमत
जात–धर्म झाला श्रेष्ठ
सणावारांना, आपल्या साधू–संतांच्या जयंत्यांना
चौकाचौकात विद्युतपोलवर आपण
आपल्या धर्माचे बॅनर, पताका बांधतो,
भर रस्त्यात बांबू ठोकून
त्यावर आपल्या धर्माचा रंग असलेल्या कपड्याच्या पट्ट्या लावून
ट्राफिक सिग्नल झाकतो
अन अपघात होताच जाती–धर्मावर येऊन भांडतो
जाती–धर्माच्या नावावर उच्छाद मांडतो आहे आपण
अन आपले पुढारीही त्याला खतपाणी घालताहेत
तेच स्वतः आपला देव–धर्म समोर करून
मंदिर–मस्जिदीत, चर्चमध्ये बसून
आपल्या जातीच्या माणसांना मतदान करा म्हणून
देवाची, अल्लाची शपथ देऊन
आपल्या जातीबांधवांना
विशिष्ट जातीच्या लोकांना मदत करा म्हणून बाध्य करताहेत
संविधानात आहे ‘Secular’ शब्द
पण न्यायालयांना त्याचा अर्थ कळत नाही
‘जाती–धर्म पुढे करून मत मागणाऱ्यांना‘ अस करण गुन्हा आहे
नाही तर शिक्षा होईल म्हणून सांगत नाहीत
ते ही कायद्याचे पुस्तक बंद करून न्यायदान करीत आहेत
सगळ कस ‘ऑल वेल’ आहे
लोकशाही आहे,
संविधानाने अधिकार दिला म्हणून ‘हेट स्पीच‘ करताहेत
आग लावणारे मस्त जगताहेत
अन सामान्य माणस त्यात भरडताहेत
लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद