जेव्हा वर्तमानपत्रात, T.V. वर बातम्या येतात
कुणा अबलेवर अत्याचाराच्या वा विनयभंगाच्या
जेव्हा दृश्य दाखविले जाते समाजकंटक छेडतांना महिलांना
कुणी ही त्या अबलेस जात नाही वाचविण्यास
आपल्या महागड्या मोबाईलमध्ये, चहाच्या टपरीवर चहा पिता पिता,
त्या प्रसंगाचे करीत असतात चित्रण
अन “हॅशटॅग (#) रोडरोमियो महिलेला छेडत असतांनाचा व्हिडियो“
अस हेडिंग देऊन WhatsApp वर व्हायरल करतात पटकन
घीन्न येते अशा लोकांची जी केवळ नावाची माणसे आहेत
कुणाच्याही मदतीस धावून जात नाहीत,
आपल्या जवळच्या मोबाईलवर त्या अबलेस वाचविण्यास
पोलिसांना फोन ही करीत नाहीत
केवळ श्रीमंतीचाच देखावा,
मोबाईल कॅमेराचा वापर केवळ कुणास बदनाम करण्यासाठी करतो
अन ब्लॅकमेल करून कुणाच्या अब्रूचे धिंडवडे काढतो
आपण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केवळ गैरमार्गाने पैसे कमविण्यासाठी करतो
पण कुणी संकटात सापडले असता आपल्या मोबाईलमधून साधा एक कॉल
डाटा संपेल, बॅलन्स संपेल म्हणून त्याच्या नातेवाईकांना करण्याचे टाळतो
भारतात सगळीकडे असेच आहे
रस्त्यावर कॅमेरे लागलेले आहेत तरी जनता वाहतुकीचे नियम मोडत असतात,
पोलीस ट्राफिककडे पाठ करत मोबाईलवर पाहत असतात
अन त्यांच्या जवळच्या वॉकीटॉकी जोरजोरात आवाज करत असतात
सगळा देखावा आहे, गुन्हा घडला तरी “हे नेहमीचच आहे” म्हणत दुर्लक्ष करीत असतात