सगळ्यांशी मिळून-मिसळून वागा

 

माझ्या जन्मदात्याने मला हेच सांगितले

जगात सगळ्यांशी पाण्यासारखे मिसळून रहा

जातधर्माची दृष्टी सोडून पहा

आज ही रस्त्याने जातांना जेव्हा मला

मंदिर, मस्जिद किंवा अन्य धर्मालये दिसतात

झुकतो त्यापुढे आदराने माथा

ते यासाठी नाही की ते देव आहेत म्हणून

ते यासाठी की कमीत कमी त्यांच्यापुढे तरी मानव झुकतो

त्यांची चांगली शिकवण अंगी बाणवतो

व कुणाचे नुकसान करण्याआधी काही वेळ तरी विचार करतो

जर हे पुण्यात्मे नसते तर कल्पना केल्या जात नाही

आज आपण नर असतो की वानर असतो

 

आभार मानतो जगातल्या सर्व देवांचे मी, त्रिवार वंदन करतो तयांना

पापपुण्याचे भय दाखवून, संकटात कशी इतरांची मदत घ्यावी लागते ते दर्शवून

इतरांपरी सहिष्णुता अंगी बाळगण्याची थोडी बुद्धी तरी तो देतो

फार, फार, फार धन्यवाद जगातल्या सगळ्या देवांचे

कुठल्या ना कुठल्या मार्गाने मानवजातीकडून पुण्यकर्म करून घेतो