समाजात आता जागृती होतांना दिसते आहे
किंवा समाजात जागृती होतीच पण कुणी ते व्यक्त करीत नव्हते
आता लोक ही पराकोटीच्या जातीधर्माच्या विवादाला कंटाळले आहेत
म्हणूनच एकमेकांच्या धर्माबद्दल आपुलकीने बोलताहेत
कोण्या हिंदूला गाईला नमस्कार करतांना बघून
एक मुस्लिम त्याच्या मित्राला म्हणाला–
“गाय हिंदूंसाठी माता अन आपण तिला मारतो हे फारच दुर्दैवी आहे
मला वाटते हे तर गुन्हा–ए–अजीम आहे
गाय हिंदूंसाठी माता आहे तर आपल्यासाठीही ती तीच असावी“
दुसरीकडे हिंदू मित्र आपल्या मित्राला म्हणाला–
“डुकराचे मांस मुस्लिमांना निषिध्द,
तर ते आपल्याला ही निषिद्धच असल पाहिजे
कारण त्यांचा अल्ला त्यांना तसे सांगतो,
त्यांचा देव त्यांना तसे सांगतो म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे
कारण देव कोणत्याही धर्माचा असो
तो कधीच वाईट कृत्य करा म्हणून सांगत नाही“
असेच मत हिंदू–मुस्लिमांचे “तलाक“, “बहुपत्नीत्वाबद्दल” होते
ते म्हणत होते–
“जर आपल्या बहिणीला तिच्या नवऱ्याने सोडून दिले
किंवा आपल्या जावयाने दुसरे लग्न करून बहिणीला वाऱ्यावर सोडले तर
ते आपल्याला सहन होणार नाही,
त्यामुळे ह्या प्रथा अमान्य करून त्या त्यागल्याच पाहिजे
हया रानटी प्रथांच समर्थन न करता
त्या आपल्या धर्मातून/समाजातून समूळ नष्ट केल्या पाहिजे“
समाजात असलेल्या हया असल्या कुप्रथा पाहून
हिंदू आणि मुस्लिम बांधव
कळकळीने आपल्या भावना व्यक्त करीत होते
खरेच मित्रहो, कुणाला ही आपल्या धर्मातील
किंवा इतर धर्मातील कुरीती पाहून आनंद होत नाही
किंवा त्या कुरीती पाळाव्याश्या वाटत नाही
प्रत्येकाला आपल्या धर्मातील वाईट चालीरितींचा त्याग करावासा वाटतो
व आपला धर्म प्रगतिशील व्हावासा वाटतो
एकमेकांच्या धर्मात असलेल्या कुरीतींपासून प्रत्येक धर्मियाचे मन द्रवणे
म्हणजेच समाजपरिवर्तन होय