समाजात होत असलेला बदल दिसतोय,
लोकांच्या विचारात होत असलेला बदल दिसतोय,
लोकांना आता अतिदैववादाचा कंटाळा आलाय
मंदिर–मस्जिदीचा वाद नको झालाय
डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, तुकडोजी महाराज
हे त्यांच्यासाठी देव झालेय
यांच्या नावानी रुग्णालये, शाळा उभारण्यास प्राधान्य देऊ लागलेय
दररोजच्या राजकीय जातीवादाला ते कंटाळलेय
“उगीचच जाती निर्माण झाल्या” असे ते म्हणू लागलेय
ही तर “नवी विचाराची” पहाट दिसतेय
देव, जात–धर्म ही ओळख आता आपला देश पुसतोय
अंतराळात याने धाडून भारत देश यशाची पायरी गाठतोय
कॉम्प्युटरचा वापर करून विज्ञानात नवनवे कीर्तिमान रचतोय
समाजात होत असलेला बदल दिसतोय