जेव्हा दिसते कुणा विद्यापीठाला समाजसुधारकांचे नाव दया म्हणून
किंवा कुठल्या सरकारी जागेवर महापुरुषांचे भव्य पुतळे उभारा म्हणून
आंदोलने, उपोषणे, स्वतःस त्यासाठी जाळून घेणे
मोठे विचलित करते ते पाहणे
अरे पण काय होणार आहे त्या समाजसुधारकांचे किंवा महापुरुषांचे नाव त्या वास्तूला दिल्याने
काय अशाने शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे ?
किंवा त्या महापुरुषांचे पुतळे पाहून पोट भरणार आहे ?
अरे त्यापेक्षा हया समाजसुधारकांनी जस शिक्षण प्राप्त केले
तसे तुम्ही त्या विद्यापीठातून प्राप्त करा, त्यासाठी संघर्ष करा,
महापुरुषांच्या नावे दवाखाने उभारून
सामान्यजनांना दर्जेदार औषोधोपचाराची सुविधा निर्माण करा,
त्यासाठी भांडा
जर तुम्हाला समाजसुधारकांचे, महापुरुषांचे पुतळे उभारावयाचे आहेत
तर स्वतःच्या पैशानी जमिनी विकत घ्या व त्याच स्वपैशाने महापुरुषांचे पुतळे उभारा
किंवा त्याला समाजसुधारकांचे नाव दया
उगीचच सरकारी पैशाचा अपव्यय टाळा