सर्वात श्रेष्ठ संविधान

 

माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ संविधान

त्यानंतर वेदपुराण

प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचे,

आपल्या धर्माचे हस्तलिखित वाचण्याचे

मग ते असो गीता, बायबल वा कुराण

परंतु मित्र हो हे विसरू नका

ते बिनबोभाट, न भिता वाचण्याची परवानगी देते

आपले संविधान,

जे आहे सर्वात महान

मित्र हो, हाच सर्वात पवित्र ग्रंथ, सर्वांना देतो अधिकार समान,

सांगतो कायद्यापुढे आहेत सगळे एकजान

 

लिहिले असते जगातल्या कोणत्याही धार्मिक धर्मग्रंथात

स्त्री, प्राण्यांबद्दल घाण

त्यात वर्णव्यवस्थेप्रमाणे असतो मनुष्याला मान

तरी आम्ही डोळे झाकून, होईल देवाचा कोप म्हणून

पवित्र समजून करतो त्याचे सुमिरान

 

सोडा आता हा धर्मांधपणा,

धर्मातल्या अन धर्मग्रंथातल्या चांगल्या तेवढ्याच गोष्टी जीवनात अनुसरा

त्याज्य गोष्टींचा त्याग करा

 

धर्मग्रंथ तरी उच्चनीचता, विटाळ, शिवाशिव,

आपल्या धर्माप्रमाणे शेंडी, दाढी, केस वाढविणे,

वेगळ दिसाव म्हणून धोतर, लुंगी, गाऊन घालून हिंडणे,

इतरांच्या धर्माला, त्यांच्या अनुयायांना कमी लेखणे शिकवितो

परंतु भारताचे संविधान सगळ्यांना

केवळ माणूस समजून मानाने जगण्याचे बळ देतो

 

माझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ संविधान

त्यानंतर वेदपुराण