काय कुणाच्या जाती–धर्मान, देवाच्या द्वेषाने पछाडून ग्रस्तादीत होता
त्यापेक्षा सहिष्णू बनून सर्वधर्मीय बना व जगाकडे प्रेमाने बघा
पहा जगात किती चांगली माणसे आहेत
मुस्लिम ज्ञानदेवांचे पसायदान गातात,
हिंदू दर्ग्यात जाऊन अल्लाची कव्वाली गातात,
ख्रिश्चन सगळ्या देवांची गाणी गातात तर शीख
“जो बोले सो निहाल सत श्री अकाल” म्हणतात
कुणाला ही कुणाच्या देवाबद्दल वावग नाही
प्रत्येकजण एकमेकांच्या देवाच सुमीरन करतो
ते इतर देवाची गाणी गातात तर ते नाही बाटत
अन ऐकणाऱ्यांचे ही कान नाही फाटत
तर कुणाच्या जाती–धर्माला, त्यांच्या देवाला नावे ठेवतांना
आपल्याला लाज का नाही वाटत
का मग आपण एकमेकांना हिणवून मागे राहतो?
“ससा अन कासवाच्या शर्यतीगत” ईर्षेने धावतो
थोडा तरी समजूतदारपणा घ्या
एकमेकांशी गोडीगुलाबीने रहा, स्वधर्मे सूर्य पहा