साई शिर्डीचे

 

जाव शिर्डीत तर वाटते

साई नाही राहिले आता साई

बनले श्रीमंतांच्या गळ्यातले ताईत

झाले ते आता साईबाबा

नाही त्यांच्याजवळ गरिबांसाठी जागा

 

साई तर बनले आता brand

झळकती पंचतारांकित हॉटेल पासून, तर

छोट्यामोठ्या टपरीच्या बॅनरवर बनून grand

साईने सोडून फकीरीचा चोला

बनलाय आता market चा trend

 

घ्यावी कुठलीही वस्तू त्यावर मुद्रा साईची

टाकावी नजर दुकानांवर तर दिसती

विविध रूपे अन नावे साईची

भिकारी ही भिक्षा मागण्या घेती साईचे अवडंबर

प्रत्येकाने स्वार्थापुरते साईस केले आपला brand ambassador

 

साई नाही राहिले आता दिनदुबळ्यांची काठी

ते तर बनले धनदांडग्यांचे साथी

दररोज नेसती भरजरी वस्त्रे

ल्याती रत्नजडित दागिणे

चंदनाच्या पालखीसवे दिमतीस हजारो चाकरे

साई बनला सेलेब्रिटी

फक्त व्ही. आय. पीं. च्या घेतो तो गाठीभेटी

त्यांच्यामागे उभा राहून

तो ही पोज देई फोटोसाठी

 

साई बनला आता करोडपती

राहू लागला सुरक्षा घेऱ्यात

वाटते, साईस आला आता कंटाळा गरिबीचा

लबाडांच्या संगतीत राहून

ठेवून श्रद्धा पैश्यांवर विसरला मार्ग सबुरीचा