सात आश्चर्यासम अत्याधुनिक शिल्प

 

कोणी भव्य मंदिर बांधे अन त्यात कुठल्यातरी देशातून

वाजतगाजत चितारण्या मूर्ती, “शिळाआणे

तर कोणी ऊत्तुंग मस्जिद बांधे अन त्यास

जगातली सर्वात मोठी मस्जिद संबोधे,

कोणी उत्कृष्ट कलाकूसर करून आकर्षक चर्च उभारे

अन व्हॅटकीन सिटीच्या पोपच्या हस्ते उदघाटून

त्यास सेंट बॅसिलिकाची प्रतिकृती पुकारे

 

बांधा धर्मालये यात काही वावग नाही

पण वाटते, आम्ही राहतो आधुनिक युगात,

आम्हाला गरज आहे सर्वधर्मसमभावाची, भाईचाऱ्याची

म्हणून उभारावे जगातील सात आश्चर्यासम असे अत्याधुनिक शिल्प

ज्यास कुठल्याही दिशेने पहिले असता त्यात हिंदूस मंदिर दिसावे,

मुस्लीमास मस्जिद, ख्रिश्चनास चर्च, कुणास स्तूप तर कुणास Synagogue भासावे

 

पाहताच पटकन झुकावा आदराने माथा त्या वास्तूसमोर

तुटाव्या जातीधर्माच्या शृंखला, मिटावा द्वेष,

वहाव्या निर्मल धारा एकतेच्या, अखंडतेच्या मनामनातून,

जागतिक वारसा यादीत व्हावे ते सामील युगेयुगे प्रेरणा देत बंधुभावाची

आम्हाला गरज आहे अशा जागतिक ठेव्याची

ज्यातून हिंदूंना आशीर्वाद मिळेल, मुस्लिमांना बरकत

 

अन जर जातीधर्मासाठी भांडाल तर गत माझ्यासारखी होईल

हे आपला छन्नविछिन्न, रक्तबंबाळ झालेला देह दाखवीत

एकतेचा संदेश देत प्रभू येशू दिसेल सांगत