सामाजिक कारसेवा

 

मित्र हो,

कुठल्याही देवीदेवतांच्या कारसेवा करण्याऐवजी

वा त्यांना भरमसाठ देणग्या देण्याऐवजी

कुठल्याही समाजाच्या सभासमारंभांना

वा त्यायोगे होणाऱ्या कार्यक्रमांना

लाखोंच्या संख्येत जमण्याऐवजी

मित्र हो

तितका वेळ काढा

आपल्या सभोवती असणाऱ्या

असहाय, अगतिक माणसांना मदत करून

व अज्ञान, दारिद्र्य, बेरोजगारी या विरुध्द लढून

समाज सलोख्यासाठी प्रयत्न करून

करा सामाजिक कारसेवा

दया भरमसाठ देणग्या

उभारणीसाठी नवे कारखाने, नवे प्रकल्प,

घेण्यासाठी नवी औजारे, बीबियाणे

वाचविण्यासाठी प्राण त्या शेतकऱ्यांचे

जे कर्जबाजारी होऊन मरतात जीवाने

 

मित्र हो, हीच खरी कारसेवा

अन हीच खरी देणगी

शुल्लक गोष्टीसाठी कशासाठी किड्यामुंग्यांसारखे जमता

जातीभेद, प्रांतभेद विसरून

पुसा आसवे आपल्या भाऊबंदांचे

मंदिरमस्जिदीसाठी रक्त सांडण्यापेक्षा

हे आहे आपल्या हिताचे