इलेक्शनचा फॉर्म भरण्याआधी मंदिर–मस्जिदीच्या पायऱ्या चढल्या,
हाता–पायात लाल, पिवळे, काळे धागे बांधले,
अन हे करून, देवच आता आपल्याला निवडून आणेल हे जाणले
एवढ कमी की काय, लोकांची sympathy मिळावी म्हणून,
झोपडीत जाऊन गरिबांच्या घरी स्वयंपाक केला, त्यांची उष्टी भांडी घासली,
उरवठा–पुरवठा म्हणून मंदिर–मस्जिदीत
डोक्याला लाल, निळे, भगवे, हिरवे कपडे बांधून सेवा ही दिली
पण मत कमी पडल्याने, चांगले उमेदवार निवडून न आल्याने,
इलेक्शन हरल्यावर, देव नाही तर आपले काम आडवे येते, हे मानले
“हातात संविधान घ्या” नाहीतर “हिमालयात जाऊन ध्यानस्त बसा“
लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी किती ही करा हा असला प्रकार सगळा
पण जनता जाणते कोण आहे धूर्त बगळा
हे सगळ केल्यापेक्षा खरा देव सामान्य माणसात आहे
त्यांची पडली–सडली कामे करा, त्यांचे प्रश्न मार्गी लावा
मग पहा कशी जनता तुम्हाला डोक्यावर घेते
अन बसाल फक्त देवाच्या भरवशावर
अन जाऊन मंदिर–मस्जिदीत बांधाल काळे, लाल दोरे
तर भाऊ, deposit जप्त होऊन फजिती होते