सावध व्हा, नाही तर याल रस्त्यावर

 

जेव्हा कोणत्या साधू, खादिम वा पाद्रीवर

लागतात आरोप व्यभिचाराचे, भ्रष्टाचाराचे

पाहून त्यांचे वागणे बेतालपणाचे

टि.व्ही. वर दिसे यातून सुटण्या कसे घेती ते प्राण लोकांचे,

कसे देती साक्षीदारांना आमिष पैशाचे,

कसे लाविती मोठमोठे नामांकित वकील देशाचे

जेव्हा देई शिक्षा त्यांना सन्माननीय कोर्ट

थरकाप उठे काळजाचे

 

मित्र हो, भक्ती असावी पण अंधश्रद्धा नसावी

आपल्या या अशा अंधभक्तीचाच अशी लंपट फायदा घेती

अन देवधर्माच्या आड

घेऊन फायदा आपल्या पैसा, प्रसिद्धी अन पॉवरचा कुकृत्ये करिती

आपण जातो मोठ्या भक्तिभावे त्यांच्याकडे

कि तेथे जाण्याने होईल आपल्या संकटाचे निवारण

टळेल विपदा, ऐकता त्या दिव्यपुरुषाचे प्रवचन

करून आपल्या सर्वस्वाचे समर्पण

 

जागोजागी त्यांचे मठ उभारून

करतो त्यांच्या नावाचे जागरण

पण जेव्हा दिसे या धर्मप्रचारकांची अशी बीभत्स कृती

प्रश्न पडे आता करावे कुणाचे सुमीरन

 

मित्र हो, आपला देव आपल्या हृदयातच ठेवा

जा आपल्या जवळच्याच मंदिर, मस्जिद, चर्चमध्ये

जाण्यापेक्षा असल्या लाक्षागृहामध्ये

शिकवा आपल्या पाल्यांना सरकारी शिक्षण संस्थांमध्ये

न भलावता या लंपट चोरांच्या मोठमोठ्या संस्थांना

जे ठेवून चालविती गुरुकुल, मदरसे वा मिशनरी या मधाळ नावांना

 

या तथाकथित संतांचे, खादीमांचे, पाद्र्यांचे प्रताप पाहून

आता तरी व्हा डोळस,

नका भलावू यांच्या भव्यदिव्यतेला, त्यांच्या मोहक वाणीला

वेळीच ओळखून या तथाकथित धर्ममार्तंडांचे अवडंबर

सावध व्हा, नाही तर याल रस्त्यावर