सुखाचा विपर्यास करू नका

 

मित्र हो कुणी पक्षांना दाणे टाकत असेल तर त्याला हसू नका किंवा विचित्र बोलू नका

त्याच्या मुलांना मस्तवाल फिरतांना पाहून त्याची हेटाळणी करू नका

कारण जो गृहस्थ पक्षांना दाणे टाकतो

त्याने त्याच्या आयुष्यात खूप संकटे झेलली असतात

त्यामुळेच आपण सोसलेली दुःखे आपल्या मुलाबाळांनी सोसू नये

या विचाराने तो आपल्या अनुभवातून पक्षांना दाणे टाकत

थोडेफार सुखाचे क्षण उपभोगत असतो

जरी त्याचे मूल ऐश करत असतील पण एक दिवस त्यांच्या या बेताल वागण्याने

ते ही एक दिवस संकटात सापडून, देवाची करुणा भाकत, पक्षांना दाणे टाकत

चांगले दिवस यावे म्हणून, ईडापीडा टळण्याची वाट पाहत असतांना दिसतात

 

मित्र हो, सुखदुःख कुणालाच टळल नाही

आपण चांगली कर्म केली तर आपली वंशावळ त्याचे सुख भोगतील

अन त्या सुखाचा त्यांनी विपर्यास केला तर

ते ही दुःखाचे चटके सहन करतील

व एक दिवस असेच पक्षांना दाणे टाकत किंवा तीर्थयात्रा करत

देवाला विनवणी करत असतांना दिसतील

 

म्हणून कोणी सुखात दिसतो व आपण भगवंताची आराधना करून ही

दुःखात खितपत पडतो म्हणून दुःखी होऊ नका, माजू नका जमिनीवर रहा

सभोवताली काय घडते ते डोळसपणे पहा