सुखात असतांना मनुष्य
असुरापरी माजतो
प्राणीमात्रांना पायदळी तुडवितो
येता स्वतःवर विघ्ने
घायमोकून रडतो
भिकाऱ्याप्रमाणे करुणा भाकतो
हा मूर्ख जातो देवालयात
साधू, फकीर, झोलाछाप बाबांच ऐकून
आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल
असा प्रचंड कर्कश आवाज करून
देवाची स्तुती आळवितो
प्राणिमात्रांवर दया करण्याऐवजी
स्व सुखप्राप्तीसाठी त्यांचा बळी देतो
इतरांवर परोपकार करून झिजण्याचे सोडून
झाडे तोडून, मनःशांतीसाठी चंदन उगाळतो
मनुष्य शेवटी मूर्खच
जिथे तिथे हा आपला स्वार्थ पाहतो