सोडा खुळचट समजुती

 

मित्र हो मला वाटते मानवाला

देव, वेद, शास्त्र, पुराणात लिहिलेल्या ओळींचा अर्थच कळला नाही

जर त्याला देव अन वेदपुराणे समजली असती तर त्याने

घर संध्याकाळी झाडू नये नाही तर लक्ष्मीदेवी घरातून निघून जाते

असे म्हंटले नसते

 

लक्ष्मीदेवीला काय तुम्ही मूर्ख समजलात का हो ?

मित्र हो अस्वच्छ ठिकाणी आपल्यालाच बसावस वाटत नाही

मग लक्ष्मीदेवी तरी तिथे नांदणार आहे का ?

घर झाडून स्वच्छ करू तेव्हाच तिथे लक्ष्मी नांदेल ना

मग घर सकाळी झाडो वा संध्याकाळी

तेथे स्वच्छता असेल तर सुखसमृध्दी केव्हाही तुमच्या घराच दार ठोठावेल,

तिला काळवेळेच बंधन नाही फक्त शुचिर्भूतता हवी

 

एवढच नव्हे घरात नव बाळ जन्मल, तर वृध्दि झालीम्हणून,

देवाला हात लावू नये म्हणतात

किती मूर्ख आहात रे

जेव्हा मुलबाळ होत नाही तेव्हा प्रत्येक दवाखाना, मांत्रिकापासून तर

सडल्या जडीबुटीवाल्याचे उंबरठे झिजवता,

देवाला नवस बोलता, स्वतःच्या घरात जीव फुलावा म्हणून

नवस फेडून कोंबड्याबकऱ्याचा जीव घेता

अन घरात बाळ जन्मताच वृध्दिझाली म्हणून,

त्याच देवाला विटाळहोईल म्हणून, हात लावण्याचे टाळता

मूर्ख कुठले !

तुम्हाला बुध्दी आहे कि नाही रे

ज्या देवामुळे तुमचा वंश वाढला असे समजता

त्यालाच शुद्धाअशुध्दीच्या विचाराने चिढवता

 

जरा शास्त्र वाचा, त्यात जर कुणा राजाराणीला मुल होत नसेल तर

ते राजाराणी देवाचा तप करून, देवाला प्रसन्न करून,

त्यांना संतती होऊ दे म्हणून वर मागायचे

संतती होताच ते राजाराणी देवाला यज्ञ करून,

ऋषीमुनींचा यथोचित सन्मान करून,

साऱ्या प्रजेला अन्नदान, सुवर्णमुद्रेच दान करून

आपल्या सुखात सामील करून घ्यायचे

 

हे फक्त आपण कथा म्हणून वाचतो

पण त्याचा अर्थ जाणण्याचे टाळतो

 

मित्र हो चांगल्यावाईट गोष्टीतील फरक जाणा

अस्वच्छता घरात दरिद्रताआणते व नवीन बाळ वंशवृद्धिकरते

त्यामुळे घर, ऑफिस, परिसर कधीही झाडून स्वच्छ ठेवा

जेव्हा जेव्हा आपली वास्तू स्वच्छ ठेवाल

तेव्हाच तुम्ही लक्ष्मी कमवाल

घरात बाळ जन्मताच जल्लोष करा

वंशवृध्दी केली म्हणून, आभार मानून, देवाचे पाय धरा

 

सोडा हो खुळचट समजुती,

वेदशास्त्र हे तेजोमय आहे,

त्याच्या ज्योतीत ज्ञानवंत होऊन न्हाऊन निघा

जगाकडे शकुन, अपशकुन, अंधविश्वास ह्या गोष्टी सोडून बघा