सोडा प्राणघातक व्यसन

 

महागड्या गाडीत फिरण, हातात सिगारेट, ओठाला दारू,

नका रे फुकाचा रुबाब दाखवू

मायबापाच्या भरवश्यावर तर हे शौक होतील पुरे

ते सरताच खिशे लागाल खाजवू

 

नका शौक करून फुकटचा ताव आणू

शरीराला कष्टाची सवय दया असू

जगाल असच बिनभरवश्याच जीण

होऊन कफल्लक, होईल जगी तुमच हसू

 

दारू, खरर्यासाठी नका आपल्या प्रॉपर्ट्या विकू

जे व्यसनात बर्बाद झाले त्यांच्यापासून काही तरी शिकू

एवढ सांगूनही नसेल येत ध्यानात, तर लक्षात ठेवा

कॅन्सरने तडफडत दवाखान्यात दिसू

 

सोडा हया घाणेरड्या सवई पटकन

काही नाही पडल दारू, तंबाखूसारख्या प्राणघातक व्यसनात

नाही तर जवानपणीच जाव लागेल मसनात