सोयीसवलतींचा लाभ घेऊन, जा सर्वात पुढे

 

S. T. बसमध्ये एका प्रवाशाने कंडक्टरला एक कार्ड दाखविले

तोच कंडक्टरने ते कार्ड पाहून त्या प्रवाशाला विनामूल्य तिकीट दिले

ते पाहून मला नवल वाटले

मग मी त्या प्रवाशाला विचारले काहो हे कशाच कार्ड आहे

तो प्रवाशी उत्तरला हे मी आर्थिकदृष्टया मागास असल्याचे कार्ड आहे

 

ते एकूण मी त्या प्रवाशाकडे पाहिले हातात घड्याळ, महागडा मोबाईल,

कडक इस्तरीचे कपडे घातलेले पाहून मी त्याला म्हंटले

काहो पण तुमच्यावरून तर तुम्ही तसे दिसत नाहीत

 

ते एकूण तो माझ्यावर रागावून म्हणाला

तुमच्या लोकांना आमच पुढे गेलेल आवडतच नाही,

आम्हाला हे संविधानाने दिल आहे

असे म्हणून तो पुढे म्हणाला

आमच्यावर सवर्णांनी किती अत्याचार केला माहित आहे का ?,

ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कृपा, त्यांच्यामुळे आम्हाला हे सर्व मिळतेय

 

मी चूप बसलो, परंतु मनात विचार पडला

ठीक आहे, संविधानाने तुम्हाला सर्व दिलय, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ही कृपा,

परंतु तुम्ही आता डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे वागता का ?

त्यांनी आपल्या समाजासाठी जो त्याग केला तो करता का ?,

आपलाच समाजबांधव उपाशी आहे त्याला दोन वेळची रोटी देता का ,

आपला समाजबांधव उघड्यावर राहतो,

त्याला आपल्या स्वतः च्या पैशातून घर बांधून देता का ?

आपल्या समाजाच्या मुला/मुलींची शाळेत शिकण्याची परिस्थिती नाही,

तर आपण स्वतः त्यांच्या शिक्षणाची सोय करतो का ?

तेव्हा नाही का आपण आपल्याच समाजावर अन्याय करत

मग अशावेळी आपण आपल्या समाजबांधवांच्या मदतीसाठी का नाही धावत

 

आठवा डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांचा त्याग

सोयीसवलतींचा लाभ घेऊन, जाऊन सर्वात पुढे,

घालवा इतर जातीविषयी असलेला राग