स्वतःचे दुःख सार्वजनिक करू नका

 

काल मंदीरात गेलो, देवाला हात जोडण झाल्यावर

देवाच्या मूर्तीसमोर जमिनीला दोन्ही हात टेकवून

छताकडे एकसारख पाहत राहिलो

मूर्तीसमोर पुजारी बसला होता

मला विचारात पडलेल पाहताच पटकन तो मला हासून म्हणाला

चिंता मे दिख रहे, हो क्या परेशानी है

मी तसाच भानावर आलो व नकारार्थी मान हलवत

तसाच त्याला हासून म्हणालो कसलीच चिंता नाही

तोच तो पंडित मला म्हणाला तो क्यो सोच मे पडे हो,

हमको बताओ क्या परेशानी है, हम हल बतायेंगे

तोच मी त्याला रागावून म्हणालो अपनी हद मे रहो,

उसी भगवान के छत्रछाया मे रहकर जीनेवाले, तू क्या मेरी परेशानी दूर करेगा

मैने मेरी परेशानी उस भगवान को बताई है, वो ही दूर करेगा

असे म्हणून मी तेथून निघून आलो,

तो पंडित माझ्याकडे रागाने पाहत होता

 

मित्र हो, मी कशाला third person ला माझ्या वेदना सांगू

कुणाला कुणाशी काहीही घेणदेण नसते

प्रत्येकजण संकटात असलेल्या व्यक्तीचा फायदा घेत असतो

व आपली पोळी भाजत असतो

 

अरे जो पंडित स्वतः देवाच्या आश्रयाने मंदिरात राहतो, खातो, तिथेच झोपतो

तोच स्वतःला देवापेक्षा ही मोठा समजून

दुसऱ्याला दुःख दूर करण्याचे उपाय सांगतो

जर त्या पंडितात माझे दुःख दूर करण्याचे सामर्थ्य होते

तर का मग तो स्वतः देवाच्या आश्रयाने मंदिरात राहतो,

त्याला तर मग स्वतः साक्षात त्या देवाच्या मूर्तीच्याच ठिकाणी

विराजमान व्हायला पाहिजे होत

मित्र हो, आपल्या स्वार्थासाठी मानवाने देवाचा ही वापर

केवळ बागुलबुवा म्हणून केला आहे

त्याला बाजूला ठेवून भक्तीचा व्यापार करणे सुरु केल आहे

 

विनंती आहे दोस्त हो तुम्हाला,

आपल्या वेदना, दुःख आपल्या जवळच ठेवा,

कोणा समोर उघड करू नका, देवाजवळ जा, तिथे रडा,

त्याला आपले गाऱ्हाणे सांगा व घरी मनात नवी आशा घेऊन या

नक्कीच तो परमेश्वर तुम्हाला काही ना काही मार्ग दाखवेल

नका येऊ कुणाच्या बोलण्यात,

लोक आवळा काढतील देऊन तुमच्या हाती बोर

मित्र हो, हे विसरू नका त्याच्या घरी जरी आहे देर पण नाही अंधेर