स्वतः शास्त्राचा अर्थ लावा व जीवन सुखरूप करा

 

रस्त्याने जातांना दिसले मंदिर म्हणून दर्शनासाठी आत गेलो

एका बाजूला बाया मंडळींचे भजन सुरु होते

मी देवाचे दर्शन घेतले अन प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली

तोच तिथला पंड्या मला रागावून म्हणाला

तुम को समझता नही क्या, भजन चालू है,

फिर भी आप प्रदक्षिणा मार रहे हो

 

 

मी त्याच्याकडे पाहिले

व त्या भजन करीत असलेल्या बायांकडे ही पाहिले

त्या देवाच्या गाभाऱ्यापासून फारच दूर अंतरावर भजन करीत होत्या

तोच मला राग आला व त्या पंड्याला तेवढेच रागावून म्हणालो

तुम मुझे मत सिखाओ, मै भी ब्राह्मण हू,

मुझे पता है पूजाअर्चा और धरम का कैसे पालन करना है

असे म्हणून मी प्रदक्षिणा मारत राहिलो

व प्रदक्षिणा मारण पूर्ण होताच देवळातून बाहेर निघून गेलो

तो पंड्या माझ्याकडे रागाने पाहत होता

 

 

कसे हे विचित्र लोक,

केवळ देवाच्या गाभाऱ्यात बसून स्वतःला सर्वज्ञ समजून

लोकांना पांडित्याचे डोस पाजतात

स्वतःला तर कर्मकांड समजत नाही

केवळ स्वतःचे महत्व वाढविण्याकरिता

काही तरी भलतेसलते बरळतात

स्वतः मुतारीहून आल्यावर, पाय न धुता,

देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात

अन दुसऱ्याला पावित्र्याच्या गोष्टी शिकवितात

अन आपण ही मुर्खासारखे तो पंडित सांगतो म्हणून

त्याचे बोलणे आंधळ्यागत मानून,

त्याचे मुतारीहून आल्यावर न धुतलेल्या पायांवर डोके ठेवून

स्वतःस धन्य समजतो लवून त्याच्या पायास नमस्कारून

 

मित्र हो, डोळस बना, भजन चालू असतांना

किंवा आरती सुरु असतांना सुद्धा देवाच्या प्रदक्षिणा मारता येतात

असे केल्याने देव काही शाप देत नाही

किंवा तुमच्या कार्यात विघ्न आणत नाही

 

आरती सुरु असतांना फक्त या करिता प्रदक्षिणा मारत नाहीत

कारण सर्व तिथे जमलेले आरती करण्याच्या स्थितीत असतात

व केवळ एकटे आपण प्रदक्षिणा मारू लागलो तर ते विचित्र दिसते

फक्त similarity maintain करण्याकरिता

आरती सुरु असतांना देवाला प्रदक्षिणा मारत नाही, दुसर काही कारण नाही

 

जरा विचार करा, अशा अशिक्षित, अर्धवट ज्ञान असणाऱ्या,

देवाच्या भरवश्यावर आयत खाऊन जीवन जगणाऱ्या व्यक्तिंच ऐकल्यापेक्षा

थोडी बुद्धी वापरून स्वतः शास्त्राचा अर्थ लावा व स्वतःचे जीवन सुखरूप करा