भगवंता किती मोठा स्वार्थी तू
मोठमोठ्या मंदिरात बसला मोठ्या दिमाखात
भरजरी तलम वस्त्रे परिधान अंगात
पंचपक्वान्नाचा पहिला घास तोंडात
गाण्यास थोरवी ब्रह्मवृंदांचा साथ
दिमतीस हजारो भक्त्त तुझ्या
तुझा वेगळाच थाट
तुझ्या सवे सजती
विविध रंगी दुकाने, भरून फुल–हार
ते जेव्हा विकती जिन्नस किमतीत फार
तू होसी डोळे मिटून निर्विकार
जेव्हा उमडे गर्दी भक्तांची
भरता शिग दानपात्रांची
तुज मिळे समाधान अपार