हरफनमौला

 

मी हरफनमौला, देवाचा प्यादा

समुचे विश्व माझे, साऱ्या जगाचा मी राजा

खाना मुशाफिरी मे, सोना मस्जिदी मे

ना माझा ठावठिकाणा, त्यात रूप ही गबाळे

बोलो लोक काहीहि उणादुना

तारणहार तो माझा नीला कमलीवाला

राम भरोसे माझा जीना

 

बजरंगबली, रहमत अली,

दुर्गा, गौरी वा मदर मेरी

सगळे माझे सगेसोयरे

होतो प्रत्येक धर्मात मी रममाण रे

अल्ला मेरा मालिक“,

राम का मै बंदा“,

परवरदिगर माझा निगाहबान रे

 

काखी दत्ताची झोळी

अंगी फकीराची चोळी

दंडावर रुद्राक्ष, बोटे फिरवी माळी

अन क्रॉस असे गळी

पाहून या अवतारा

जे होती माझ्यावर रुसू

माफ कर त्या बापुड्यांना

हीच माझी विनंती तुला प्रभू येशू