हलकट मानव


किती स्वार्थी आहे बघा मानव

स्वतःच्या सुखासाठी

देवाचे झिजवते उंबरठे,

त्याला घालते साकडे

पण सर्व काही व्यवस्थित झाल्यावर

त्यालाच तोंडावर पाडते


सरकारी जागेवर अतिक्रमण करून

वा सरकारी रस्त्यावर मंदिर, मस्जिद बांधून

त्यात ठेवते देवी देवतांच्या मुर्त्या

वा दरबार भरवून घालते सजदे

स्वतःच्या स्वार्थासाठी देवाला संकटात टाकून

अतिक्रमणाच्या जागेत उभारून

कोर्ट कचेरीच्या भानगडीत उलगडवून

टाकतो त्याला संकटात, आरोपी बनवून


ज्या देवाकडून हा सुखाची कामना करतो,

ज्या देवाला हा डोक्यावर छप्पर मागतो

त्या देवाचे देवालय अतिक्रमणात उध्वस्त करून

त्याला रखरखत्या उन्हात दिवसभर उभे ठेऊन

काळोख्या रात्री चोरांच्या भयात ठेऊन

अनाथासारखा उघड्यावर ठेऊन

हालहाल करतो त्यास यमयातना देऊन


अतिक्रमण हटवितांना करतो दंगे अन मारामाऱ्या

जमीन हडपण्यासाठी बयेच करतो आरत्या अन जागरणे

त्यासाठी नित्याचीच आमरण उपोषणे

फारच स्वार्थी हा मानव

झालं नाही मनासारख तर त्यासच देतो दूषणे