ज्या संतांनी न पाहीले कधी अन्न, वस्त्र, निवारे
न ज्यांना मिळाले कडे पहारे
हसत असतील तेव्हा ते
मिळती त्यांना करोडो रुपये, वातानुकूलितगृहे
अन जडजवाहिरे
उभ्या आयुष्यात ज्यांना न कधी मिळाला
कण अन्नाचा वा तृण धान्याचा
नसता वस्त्र अंगावर मिळे दगडधोंड्याचा मार
ज्या गळ्यास जिथे दुर्लभ फुलमाळ
मिळे शिव्या अन हेटाळणीचा अंगार
अवघे आयुष्य घालविले ज्यांनी जनकल्याणात
न ठेवली अपेक्षा कधीही मनात
झिजविला देह चंदनापरी उभी हयात
ठेवूनी देह कल्याणार्थ गेले गगनात
जेव्हा तयास मिळती करोडो रुपये,
उंची वस्त्रे, पंचपक्वान्ने अन आभूषणे
हसत असतील पाहुनी जनसामान्यांची चाळे
त्या संतांची शिकवण ठेवून बाजूला
न करती जवळ गोर–गरिबाला
जिथे न मिळे भुकेल्याला अन्न अन नागड्याला वस्त्र
मांडून बाजार भावनांचा
चढविती मूर्तीवर आभूषणे काही धूर्त
संतांच्या नावावर मागून भिकेचा पैका
करिती स्वतःची शिलेदारी बळकट चतुरस्त्र
बांधून मोठमोठाली मंदिरे आणिती भक्तीचा आव
पाहून हे, हसत असेल देवराय
जीवंतपणी न मिळे कैवल्याचा स्वर
न मिळे खायला पोटभर
अन न मिळे वस्त्र नेसावयास पायघोळ
जेव्हा मिळे करोडो रुपयांचा हार
व बरसे रुपयांची बहार
किव करून जनसामान्यांची
होत असेल जगदीश्वर हसण्यावर स्वार