हायस

आता वाटते मले हायस, आता वाटते मले हायस

बायको पोरा सोबत राहून शानीन रहायच

दारूच्या नादान संसाराचा झाला होता पचका

बायको पोरायाची गेली रया

घरादाराचा झाला होता इचका

हया दारून विकाया लावली सोन्यासारखी जमीन

घरदार अन जवळच सर्वकाही गाहीन

झालो घरनादार चऱ्हाट्यावर बिऱ्हाड

कसा तरी बाप्पा, दारूच्या नादातून सुटलो

तिनका तिनका बिखरलेला संसार

जोडण्यात गुंतलो

आपबिती सांगितली, काही पडल नाही त्यात

आताच सोडा दारू, करते ते जीवनाचा घात