हारलेला माणूस

 

नेहमीप्रमाणे मंदिर, दर्ग्याबाहेर उभा राहून दर्शन घेत असतांना

तेथून आतून दर्शन करून बाहेर येत असलेला एक भाविक

मला म्हणाला अंदर जा के दर्शन लो ना

मी त्याला हसून नम्रपणे म्हणालो नाही,

मी त्या देवाचा, पीराचा नेहमीचा गिऱ्हाईक आहे,

दररोज नित्यनेमाने त्याला दुःख सांगायला, काही तरी मागायला येत असतो,

त्यामुळे तो ही मला आता कंटाळला,

शिवाय तेथील पुजारी ही माझ्याकडे नाक मुरडून

नेहमीचाच फुकट्या भक्त म्हणून माझी हेटाळणी करतात

त्यामुळे कुणालाही माझा त्रास न व्हावा म्हणून

मी बाहेरूनच दर्शन घेतो, मन्नत मागतो

असे म्हणून मी दर्शन घेवून/सजदा करून निघून आलो

 

मित्र हो, यात खोट काही नाही

हारलेला माणूस जेव्हा दररोज मंदिर/मस्जिदीत जातो

तिथे आपले गाऱ्हाणे सांगतो, तेव्हा तेथील देव ही त्याला कंटाळतो

व तेथील खादिम, पुजारी ही ये हररोज ही आता हैम्हणून नाक मुरडतो

परंतु मरता क्या न करता“, नाईलाजाने मनुष्य देवाचे उंबरठे झिजवतो