हुंडा, हुंडा, हुंडा

हुंडा, हुंडा, हुंडा ऐकून आला विट

वाटते हुंडा घेणाऱ्यांची करावी लाल कानपीट

अरे पोटची लाखमोलाची पोर दिली त्यान

तुम्ही म्हंटल्या परीस देनघेन केल गुमान

तरी म्हणता हुंडा कमीच भेटला भडव्यानो

तुमच पोर पोर आहे अन दुसऱ्याच काही नाही

पोरग झाल म्हणून काय कोणते तीर मारले

हुंड्यासाठी मात्र डोळे वटारले

चूक झाली त्याची जन्म दिला पोरीला

समाजच झाला मुर्दाड म्हणाव कुणाला काय ?

जो तो घेतो हुंड्यामागे धाव