हुंडा मागत असल कोणी, पाठीत मारा धोंडा
करा त्याले समाजासमोर नंगा
अरे, ज्याच्या मनगटात असते जोर
त्याले नसते कशाची नुपर
हुंड्यासारख्या धोंड्याले मारते तो ठोकर
लगन आहे दोन मनाच प्रेमाच गुंजन
हुंडा घेऊन टाकू नका, त्यात द्वेषाच विरजन
दोन मन जोडा तुम्ही दोन घर जोडा
हुंड्याच्या शेंड्यावर बसत नसते संसाराची घडी
बातच आणते ते घरात अन मनात तेढी
हया हुंड्यापायी झाले लाखो संसार उध्वस्त
आता तरी व्हा जागे नका होवू सुस्त
म्हणून म्हणतो