"हॅन्डल विथ केअर" धार्मिक सण

 

जागोजागी जातीधर्माची कुंपणे पाहून

राग येतो कधी कधी न राहवून

एकाच मोहल्ल्यात, सोसायटीत

राहतात विविध धर्मीय गुण्यागोविंदाने,

बोलतात एकमेकांशी आपुलकीने

पण येताच धार्मिक सण वा जयंत्या

दिसे त्यांच्यातील दुरावा प्रखर्षाने

 

एक समूह आपल्या सणाला

रोषणाई करून, गुलाल उधळून

हिडीसफिडीस नृत्य करी

मुद्दाम दुसऱ्या धर्मियाकडे पाहून,

अन येता त्या धर्मियांचा सण

तेही त्याचे उट्टे काढून,

टोळीने फिरून, धार्मिक घोषणा देऊन

तुडविती कायदा पायदळी

हातात नंग्या तलवारी घेऊन,

येता कुठल्या समाजाच्या महापुरुषाची जयंती

शासकीय कार्यालयात त्यांच्या फोटोला वाहिले जाई हारतुरे

वाटून जागोजागी अन्नपाणी

वाजवले जाई त्या महापुरुषाची जोरजोरात गाणी

समजून, ताकद नाही कुणात, आपल्याला अडवेल कुणी

 

प्रत्येक जण जातधर्म पाळू लागला

कुणालाच नाही कुणाशी सरोकार

निघता शोभायात्रा वा मिरवणूक जन्माष्टमीची

ती आपुलकीने पाहणे सोडून

नको नवीन लफडा, पाहणे हराम समजून

बसती घरात दारे, खिडक्या बंद करून

निघता कुठे उर्स त्यात नसे इतरांना हर्ष

नको बुवा भानगड म्हणून, राखून हातभर अंतर

तेथून काढता पाय घेती,

होऊ न देता उर्स मधील कुणाही व्यक्तीला तिळभर स्पर्श

महापुरुषाच्या जयंतीला पाहून कुणाच्या घरावर झेंडा,

ऐकून त्या महापुरुषाच्या त्यागाची गाणी

पाहती कुत्सितपणे त्या घराकडे कुणी

नाक मुरडून दरवाजा बंद करती, करून सुरत रोनी

 

जरी स्वतंत्र झालो, जातीधर्माच्या बेड्या पायात अजूनही

एकाचा सण आपल्याला सहन होत नाही,

दुसऱ्याचा उर्स आपल्याला कळत नाही

अन तिसऱ्याची जयंती वळत नाही

त्याही कराव्या लागतात पोलिसांच्या पहायात

ते मोठे हॅन्डल विथ केअरदिवस असतात

साध्या साध्या गोष्टीसाठी लोक एकमेकांवर रुसतात