होईल आपला ही दलाई लामा

 

मित्र हो, नको आता

भाषा, प्रांत अन जमिनीसाठी

जाळपोळ, मारझोड, चक्काजाम अन बंद

काय मिळेल आपल्याच बांधवांना छळून होऊन बेबंद

 

आठवा इतिहास पारतंत्र्याचा

किती कष्टाने मिळाले हे स्वातंत्र्य

शेकडो दूरवरच्या परकीयांनी

करून आपल्यावर आक्रमण

केला आपल्या सर्वस्वाचा अंत

 

का भुलले हे तुम्ही

अरे सोडा तो फुटीरतावाद, आतंकवाद

आपल्याच प्रांतात बॉम्बगोळे फेकून, बंदुकीच्या फैरी झाडून,

आपल्याच बांधवांचे मुडदे पाडून,

वैभवशाली इमारती भग्न करून,

कुणा हरामखोराच्या बहकाव्यात येऊन

काय मिळेल आपल्या मायबहिणींची लज्जा छिनून

 

मित्र हो, एक गोष्ट ठामपणे मनात खुणगाठ बांधून ठेवा

आज आपल्या हक्काची जमीन आहे, स्वतःचा धर्म आहे,

स्वतःचा झेंडा आहे, संविधानाने दिलेली मानवीमुल्ये आहेत

पण का असेच बेताल वागत राहिलास

तर लक्षात ठेवा, एकवेळ अशी येईल

नसेल आपले अस्तित्व,

नसेल आपला झेंडा, नसेल आपला धर्म

अन मात्र ते मिळविण्याकरिता

कित्येकवर्ष किंबहुना आयुष्यभर

राहून आपल्याच देशात परकीयांसारखे, भोगून वनवास

वा होऊन कधी परांगदा

पसरवून हात दुसऱ्यांपुढे करून दया याचना

प्रसंगी करून बंड देऊन तयास स्वातंत्र्ययुद्धाच्या नावाचा मुलामा

होईल आपला ही दलाई लामा