हो रणरागिणी

का बर पोरी

अशी कोपऱ्यात बसून मुसुमुसु रडते ?

अबला नाहीस, तू आहेस सबला हे का विसरते

काय म्हणते

झाल वय लग्नाच पण हुंड्यासाठी बापाजवळ पैसा नाही ?

होईल माझ कस बापाला याचीच चिंता राही

 

थू तुझ्या जिंदगीवर

एवढ शिकून सवरून शहाणी झालीस तू

तरी मला वाटते मागच राहिली तू

 

कर थोडा विचार

शिकली आहेस तू, तर कर नौकरी, नाहीतर व्यवसाय

रहा पायावर उभी अन जीवनाला पहचान

 

मग पहा मजा

राहत नाही तुला गरज कोणाची

तुझी जिंदगी राहील स्वतः तुझी

पुस डोळे आता

उचलू नको शर्मिन्दगी, हिम्मत आण थोडी

दाखवून दे जगाला, आम्ही आहोत आजची नारी