जेव्हा गाय, कुत्रा किंवा इतर जनावरे दिसतात रस्त्याच्या कडेला वा उकिरड्यावर
तिथल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेल, बुरशी आलेल अन्न खातांना
मनी खूप खंत वाटते
एकीकडे आपण गाईला गोमाता अन कुत्र्याला खंडोबा मानतो
त्यांना देवाचा, आईचा दर्जा देतो अन दुसरीकडे त्यांची अवहेलना करतो
अन्न दुकानातून घेऊन किंवा घरचे ही अन्न
एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून आपण उकिरड्यावर फेकतो
पण ते शीळ, बुरशी आलेल अन्न गाय, कुत्रा किंवा अन्य जनावरे खातात
पण अन्न खातांना त्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने
त्याचा संसर्ग होऊन ती जनावरे मृत्युमुखी पडतात
मित्र हो सर्वप्रथम प्लॅस्टिकलाच नाही म्हणा
प्लॅस्टिकच्या पिशव्यांना रामराम करा
म्हणजे आपल्या हातून कुणा जनावराची हत्या होणार नाही
कळकळीची विनंती करतो, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न टाकून
कृपया उकिरड्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फेकू नका
अन कुण्या मुक्या जनावराचा जीव घेऊ नका
जनावरांना बुद्धी नाही……. पण आपल्याला तर आहे
थोडा विचार करा
‘Don’t use plastic. Say no to plastic’