"Hit and Run"

 

मित्र हो “Hit and Run” चे दुष्परिणाम पाहून तरी सावध व्हा

दारू, सिगारेट तोंडाला लावण्यापूर्वी थोडा विचार करा

मद्यधूंद अवस्थेत श्रीमंत मायबापाची वाया गेलेली अवलादे

हजारो रुपयांची मदिरा पिऊन व मादक द्रवे घेऊन

जेव्हा निरपराध नागरिकांच्या अंगावरून वाहने नेऊन

त्यांचे मुडदे पाडती व तेथून पळून जाती

त्यानंतर आपल्या दिवट्याला वाचविण्यासाठी

त्यांची बेजवाबदार पालक मंडळी

जो काळ्या पैशाचा महापूर वाहवती

व क्षणात आपल्या दिवट्याला वयाच्या आधारावर

नाबालिगम्हणून बेलवर सोडविती

जे मद्यपींच्या हस्ते होणाऱ्या अपघातात बळी पडती

त्यांच्या नातेवाईकांची घाणेरडेप्रश्न विचारून,

त्यांना हिडीसफिडीस करून,

आरोपींना वाचविण्याकरिता तपासयंत्रणाजी दयनीय अवस्था करती

जे आपल्या सख्यांना कायमच हिरावून त्यांच्या फोटोपुढे अश्रृ गाळत बसती

कमीत कमी त्यांचे दुःख पाहून,

जे अपघातात मेले, त्यांच्या कुटुंबीयांची होणारी ससेहोलपट पाहून तरी

दारूसिगारेटला शिवू नका

सावध व्हा, धनदांडग्यांची पाहून ही घृणित मस्ती

 

कारण मित्र हो, ही दारू कुणालाच सोडत नाही

एकदा मद्याची झिंग चढली तर कुणालाच ओळखत नाही

तुमच्या हस्ते दुसऱ्याच नुकसान केल्याशिवाय ती काही उतरत नाही

 

दोस्त हो हात जोडतो, दारू पिऊन स्वतःच ही नुकसान करून घेऊ नका

व दुसऱ्याचा ही नाहक बळी पाडू नका

कारण जीवन दारूच्या रिकाम्या बॉटल सारख नाही

कि दारू पिल्यावर उकिरड्यावर फेकून द्याव

अन हवेच्या झुळूकाने दगडावर आपटून फुटून जाव

 

जीवन अनमोल आहे, “जियो और जिने दो