Virtual आणि Real

 

आपण ही कसे दुटप्पीपणे वागतो पहा

आपल्याला कुठल्या परीक्षेत यश मिळाल, नौकरी लागली

किंवा अजून दुसरा कुठला खुशीचा प्रसंग असला की

ऑफिसला दांडी मारून, भरपगारी रजा घेऊन,

मंदिर, दर्ग्यात, चर्चमध्ये जाऊन तिथल्या देव, पीर, गॉड पुढे

महागातली महाग मिठाई ठेवतो, खिशात हात टाकून, मुठ्ठी बांधून,

डोळ्यावर पट्टी बांधून, दान पेटीत पैसे ओततो

घरी येऊन केक कापतो, उत्साह साजरा करतो,

मित्रमंडळींना पार्टी देऊन अन्नाची नासाडी करतो, खाली सांडतो

अन घरच्या मोलकरीणीने एक दिवस जरी चाट मारली

तर तिला रागावतो, तिचे खाडे कापतो,

मोलकरीणीने भाजी चोरून नेली नाही पाहिजे म्हणून

वांगे, बटाटे, मोजून ठेवतो, मोजकाच स्वयंपाक तिला करायला लावतो

पण आपल्या खुशीत त्या अन्नपूर्णेला सामील करण्याचे टाळतो

 

समाजसेवेचा आव आणून, जाहिरात देऊन, त्यात

वृद्धाश्रमातील असहाय म्हाताऱ्यांना दाखवून

पैसे उकळणाऱ्या लोकांच्या संस्थांना,

ते फार मोठ समाजसेवेच व्रत आचरतातम्हणून तारीफ करतो

व त्या जाहिरातीतील नंग्या, भुक्या, रडत असलेल्या मुलामुलींना पाहून

आपल्या मायेला कळवळा सुटतो अन त्या वेबसाईटवर ऑनलाईन पैसे लुटतो

पण आपल्याच घरी असलेल्या नौकरांच्या मुलामुलींना आर्थिक मदत करून,

त्यांना दोन वेळ खाऊ घालून त्यांच्या डोळ्यांचे अशृ पुसण्याचे टाळतो

 

खरच समजत नाही आपण सुशिक्षित आहोत की अडाणी

Virtual दिसणाऱ्या दुःखांना सत्य मानतो अन

सभोवताल असणाऱ्या गरिबांच्या Real समस्यांना नाटक समजतो